विलगीकरणाची मुदत संपताच वाधवान यांना ताब्यात घेण्याचे आदेश


विलगीकरणाचा कालावधी संपताच कारवाई


नवी दिल्ली - विकासक व आर्थिक घोटाळ्यातील संशयित वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणारे गृह सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याच्या राज्यातील भाजप नेत्यांच्या आरोपांची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. 


विलगीकरणाची मुदत संपताच वाधवान यांना ताब्यात घेण्याचे आदेश केंद्राकडून अंमलबजावणी संचालनालयाला देण्यात आले.


महागडया मोटारी जप्त


वाधवान यांच्या पाच महागड्या मोटारी महाबळेश्वर पोलिसांनी जप्त केल्या. 


वाधवान यांना पाचगणीतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यासही स्थानिकांचा विरोध आहे.