दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्र यांच्यासह सहकाऱ्यांना पोलीसांची अमानुष मारहाण


उपाशी दिवेकरांना अन्नदान करणाऱ्यालाच उपोषण करण्याची दुदैवी वेळ


ठाणे : सोसायटीमधील भांडण मिटविण्यासाठी दिवा बीट येथील पोलीस चौकीत गेलेल्या समाजसेवक अमोल केंद्रे आणि त्यांचे सहकारी निकम यांना पोलीसांनी बेदम मारहाण केल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे लाकडाऊनच्या काळात गेल्या 28 मार्च पासून दिव्यातील गरीब जनतेसह पोलीसांचीही जेवणाची नित्यनियमाने काळजी घेणाऱ्या अमोल केंद्रे यांच्यावर झालेल्या मारहाणीचा दिवा परिसरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत दिड हजारांच्यावर उपाशी गरजूंना जेवण देणाऱ्यावरच उपोषण करण्याची वेळ आल्याची दिव्यातील ही दुदैवी घटना आहे.याबाबत केंद्रे यांनी सबंधित मारहाण करणाऱ्या अज्ञानी पोलीसांवर कडक कारवाई करण्यासाठी आनलाईन तक्रार दाखल केली आहे.


याबाबत तक्रारीत अमोल केंद्रे यांनी असे म्हटले आहे की, मारहान करण्याअगोदर ४ पोलीस बाईकवरुन आले होते.त्यातील एक शिपाई रवी जाधव यांनी अमोल म्हणून आवाज दिला होता.अमोल केंद्रे हे परिचयाचे आहेत तसेच ते परवानगी घेवून दिवा परिसरात अन्नदान करतात.याचा परिचय असूनही पीएसआय तागड यांनी अमोल केंद्रे यांना मारहान केली.तसेच सहकाऱी निकम यांचा मोबाईल फोन ताब्यात घेवून अंगावर ओळ फुटेपर्यंत बेदम मारहान केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान अमोल केंद्रे यांना झालेली मारहाण ही अत्यंत दुदैवी असल्याचे बोलले जात आहे.अमोल केंद्रे यांचा परिचय दिव्यात होणाऱ्या अन्यायावर आवाज उठविणे असा आहे.असाच प्रकार काल त्यांच्या सोसायटीत काही इमारतीचा गेट बंद झाल्यावरुन घडला होता.झालेले आपसातील भांडण मिटविण्यासाठी ते दिवा चौकी येथील पोलीस चौकीत आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेले होते.अमोल केंद्रे हे समाजसेवक तसेच गेल्या २८ मार्चपासून अन्नदान करीत असल्याने तसा परवानगीचा त्यांच्याकडे पास ही होता. त्यामुळे त्यांनी लाकडाऊनचे उल्लघन केल्याने कारवाई केली असल्याचेही म्हणता येणार नव्हते.परंतु त्यांच्या या समाजसेवेचा कल नसणाऱ्या अज्ञानी पोलीसांनी त्यांना मुद्दामहुन मारहान केली असल्याचे केंद्रे यांनी म्हटले आहे.यापाठीमागे कोणतातरी राजकीय व्यक्ती असावा अशी शक्यता आहे. म्हणुन या मारहानीची चौकशी व्हावी आणि पासधारक असूनही मारहाण का केली याची चौकशी करुन या पोलीसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.



याबाबत अमोल केंद्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख,पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांना आनलाईन तक्रार दाखल केली आहे.