मुंब्रामध्ये कोरोनाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्यांना आडकाठी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आडकाठी केल्यामुळे मुंब्रामधील दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी भादंवि कलम 353, 188 अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये  मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंब्रामध्ये शादी महल रोड, अमृतनगर येथे भाजीपाला व इतर दुकाने बंद करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गस्त घालण्यासाठी फिरत होते. यावेळी दुकाने बंद न करण्याबाबत इतर दुकानदारांना चिथावणी देणे, शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कारणस्तव अमृतनगर येथील दोघांवर भादंवि 353, 188 अन्वये तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Popular posts
‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा श्री. संजीव जयस्‍वाल यांनी पदभार स्‍वीकारला
Image
हॅाटेल प्रिन्स आयसोलेशनसाठी अधिगृहित महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला निर्णय
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image