मुंबई - आतापर्यन्त डॉक्टर नर्स, पोलीस यांच्यात देव माणूस पाहिला. पण कालचा अनुभव काही वेगळा होता..
काल एक एबीपी माझा चे धाडसी पत्रकार वैभव परब देवदूत रुपात आजी-आजोबांच्या मदतीला धावला.
नुकतीच एका आजी अजिबांच्या दुर्दैवी परिस्थितीची माहिती मिळताच,त्यांना मदत पोहचवली होती, त्याच आजी आजोबांची परिस्थिती.. व कोरोनाच्या लॉक डाऊन मधील त्यांची दुर्दैवी अवस्था.
वैभव यांनी आजी आजोबांना भेट देत त्यांच्या शब्दात कॅमेरात कैद केली आहे.
कामाच्या एवढ्या धावपळीत आणि तणावाखाली असताना देखील इंटरव्ह्यू झाल्या नंतर त्याच्यातील धाडसी व हळवा पत्रकार, माणूस हळहळला.
स्वतःजबाबदारी घेत त्यांनी खाली जात जमेल ते जमेल तेवढे जमेल तसे मदतीचा हात आणि आर्थिक हातभार पुढे केला.
विशेष म्हणजे, वैभव इथेच न थांबता व्हिडियो कॉलद्वारे त्याची चिमुकली साईशा व पत्नी नम्रता याना त्या आजी आजोबाची भेट करून दिली.
त्यावेळी त्याला अश्रू अनावर झाले..
निघताना न कळत तो वाकला गेला, पण थोडं अंतर ठेवतच त्याने आजोबांच्या पायाजवळ हात जोडले.