शासनाने सांगितलेले सर्व नियम व निर्देश पाळून परंपरागत मस्य व्यवसाय सुरू


शासनाने केंद्राने मासे पकडण्यास आणि विक्रीस परवानगी दिली असली तरी यासंदर्भात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. मासे विक्री करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे केंद्राने या आदेशात स्पष्ट केले आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे व निर्देशांचे मासेमारी या व्यवसायावर अवलंबून असणारे सर्व माता भगिनी व बांधव व मासे विकत घेणारे माता भगिनी व बांधव करताना दिसत आहेत रविवार दिनांक १२ एप्रिल २०२० रोजी विविध कोळीवाडा तसेच मासे विक्री  विविध भागात प्रभागात होत आहे तेथे दिसत आहे चेंदणी कोळीवाडा येथे राहणाऱ्या रंजना कोळी, निर्मला पाटील, राजेश पाटील, प्रसन्ना पाटील हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात पण हा व्यवसाय ते ठाणे शहरातील वृंदावन सोसायटी परिसरात करतात पण शासनाने आदेश दिले आहेत की घरीच रहा सुरक्षित रहा याचे पालन करीत आपला व्यवसाय आपल्या घराच्या बाहेर मासे विकण्यासाठी बसून सुरू केला आहे. तसेच परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व नागरिकांना मासे खाताही यावे हे दोन्ही उद्देश साध्य करीत आहेत ही दखल घेण्याची व वाखाणण्यासारखी बाब आहे . तसेच या मासे विक्री व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच आपला व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा व त्यांच्या घराची आर्थिक घडी विस्कटू नये यासाठी जो निर्णय घेतला आहे त्याचा लाभ या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांना व्हावा त्या दृष्टीने  एक सकारात्मक पाऊल या वरील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनी उचलले आहे त्याची सुरुवात त्यांनी केली आहे. 



या सर्वांनीच आपल्या चेंदणी कोळीवाड्यातील चंद्राबाई निवास या आपल्या राहत्या घराच्या बाहेरच हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे त्यांनी हे पाऊल उचलून शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून मास्क व हॅण्ड सेनिटायझर यांचा वापर करत तसेच एकमेकांच्या मध्ये जास्तीत जास्त अंतर ठेऊन सोशल डीसस्टनसिंग चे पालन करून आपला व्यवसाय करीत आहेत त्यांनी घेतलेल्या या निर्णय व पाऊलामुळे  चेंदणी कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळत आहे. दुसरा एक अनुभव हा मुंबईतील उपनगरातील चारकोप गावठाण मध्ये स्वतः मासेमारी साठी जाणारा मासेमार दर्शन केणी हा तरुण स्वतः मासे मारून आणून आपल्या घरातून हा व्यवसाय करीत आहे त्यांनी हा व्यवसाय करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे तो पकडून आणलेल्या माशांचे फोटो व दर  आपल्या व्हॉट्स अप वर टाकतो व त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरपोच डिलिव्हरी देण्याचे काम करीत आहे. या कामात त्याला त्याची आई अनुसया केणी माशांचे  वाटे लावण्यासाठी मासे साफ करून गिराईका पर्यंत पोहवविण्या च्या सर्व कामात मदत करतात. या दोन्ही अनुभवातून एक गोष्ट सिद्ध होते की शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ मासे व्यवसायावर अवलंबून असणारे व मासे खाणारे सर्व नागरिक उचलत आहेत पण बहुसंख्य संघटित व असंघटित मासे व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या माता, भगिनी, बांधवांना सर्वांनाच आम्हाला हीच हात जोडून नम्र विनंती करायची आहे की शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे व निर्देशांचे आपण व मासे विकत घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने काटेकोरपणे पालन करावे व या संकट परिस्थितीत  स्वतः चे रक्षण करावे देशातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करावे.


मी माझा व्यवसाय करणारा माझा व्यवसाय करताना ही शपथ घेतो की


शासनाने घालून दिलेले सर्व नियम व निर्देश पाळणार


मी माझे स्वतः चे रक्षण करणार
मी माझ्या विभागाचे रक्षण करणार 
मी माझ्या प्रभागाचे रक्षण करणार
मी माझ्या गावाचे रक्षण करणार
मी सर्व नागरिकांचे रक्षण करणार
मी माझ्या देशाचे रक्षण करणार
 
ही शपथ मासेमारी या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या बांधव, माता, भगिनींनी प्रत्येकानेच घ्यावी असे आवाहन आम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या साठी काम करणाऱ्या सर्वच संघटनेच्या वतीने सर्वांना करीत आहोत.