पालघर येथील “गॅलेक्सी सर्फेकटँट“ आग प्रकरण


पालघर (प्रतिनिधी) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ““गॅलेक्सी सर्फेकटँट“ लि.मध्ये (“गॅलेक्सी”) या हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीमध्ये सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास  स्फोट झाला.  तीन कामगार मृत झाले असून अन्य दोन कामगार जखमी झाले आहे, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले आहे. 


 याबाबत कंपनी प्रशासनाने खुलास्यात म्हटले आहे की, गॅलेक्सीने लॉकडाउन दरम्यान काम करण्यासाठी आवश्यक त्या मंजुरी घेतल्या होत्या आणि आमचे प्रकल्प चालवण्यासाठी आम्ही केंद्र व राज्य सरकार यांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत. तारापूर M-3 प्रकल्पामध्ये आज झालेल्या लहान इंटरमीडिएट फीड टँक स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला व तीन जण जखमी झाले. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेने प्रकल्पामध्ये आग लागली नाही. M-3 ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते आम्ही करत आहोत आणि या घटनेतील बळींच्या कुटुंबीयांना संपूर्ण मदत देणार आहोत. जे सांगितले जात आहे त्यापेक्षा वस्तूस्थिती वेगळी असून, प्रकल्पामध्ये त्या वेळी 67 हून अधिक कर्मचारी नव्हते. गॅलेक्सीने लॉकडाउन दरम्यान काम करण्यासाठी आवश्यक त्या मंजुरी घेतल्या होत्या आणि आमचे प्रकल्प चालवण्यासाठी आम्ही केंद्र व राज्य सरकार यांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत. कृपया, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका.गॅलेक्सीमध्ये इतक्या मोठ्या स्वरूपाचा प्रसंग पहिल्यांदाच घडला असून आणि तो अत्यंत दुर्दैवी असून, गॅलेक्सी सुरक्षेचे पालन करत आहे व त्यासाठी बांधील आहे. आम्ही पालन करत असलेले सुरक्षेचे मापदंड या श्रेणीतील सर्वोत्तम मापदंडांच्या तोडीचे आहेत. असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत, अशी दक्षता आम्ही घेणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.