मटण घेण्यासाठी गर्दी करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

 


वाकड – संचारबंदीत मटण घेण्यासाठी मटणाच्या दुकानाबाहेर गर्दी करणार्‍या सात जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.२४) थेरगाव येथे घडला.


अब्दुल हमिद कुरेशी (वय ४९), नुर गुलजार खान (वय २१), जावेद हाजी शेख (वय ३२), मोहमद शमिम शेख (वय ४०), सलीम अब्दुल खालीद अन्सारी (वय ३६), आझम दाऊद कुरेशी (वय ३०) आणि अजिज हाजी शेख (वय ३०, सर्व रा. वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार एस.एस. कापरे यांनी फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदी लागू असताना आरोपींनी थेरगाव येथील वहिनीसाहेब कॉलनीतील एका मटणाच्या दुकानाबाहेर मटण घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होण्याचा संभव असतानाही गर्दी केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


वाकड ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे अधिक तपास करत आहेत.