कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवणेकामी महापालिका करणार आहे ड्रोनचा वापर  


कल्‍याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका परिसरात सर्वत्र होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीकोनातुन महापालिकेने एस.के.डी. सी.एल. च्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवणेकामी, सर्वेक्षण करणेसाठी २ ड्रोन खरेदी केले असून सदर ड्रोनचा वापर  उद्यापासून करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रभागातील गर्दीची ठिकाणे हेरून सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी  ड्रोनचालक उद्यापासून  काम सुरू करतील.
एस.के.डी. सी.एल. च्या माध्यमातून  महानगरपालिकेने मुख्यालयातील वॉर रूममध्ये Public Address System लावली असून त्यातील स्पिकर्सच्या माध्यमातून महापालिकेच्या मुख्यालय, अ, ब,क, ड, जे,आय व एच प्रभाग डोंबिवली मुख्यालय येथे व शास्त्रीनगर रुग्णालय येथे तात्काळ संपर्क साधणे, सदर प्रभाग क्षेत्रात थेट उद्घोषणा करणे सोयीचे होणार आहे.