क्रांतिसुर्य सामाजिक संघटनेच्यावतीने गोरगरिबांना धान्याचे वाटप


ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन चालू होऊन 10 दिवस जरी उमटले असले तरी हातावरचे पोट असणाऱ्या धुणीभांडी करणारे, कागद, काचपत्रा वेचक, नाका मजूर, बांधकाम कामगार, मोलमजुरी करणारे महिला पुरूष, रिक्षा चालक तसेच हातावर पोट  भरणारे गोरगरीब बांधव इत्यादी यांच्या पोटापाण्याची व्यवस्था मात्र अजून झालेली नाही.


महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केले की अजून तीन महिने तरी नागरिकांना अन्न धान्याचा पुरवठा होईल. एवढा साठा आपल्याकडे आहे. परंतु अजूनही गोर गरीबांपर्यंत धान्याचा साठा पोहचलेलाच नाही. हे आमच्या संघटनेच्या लक्षात आल्यानंतर ताबोडतोब आम्ही आमच्या परिने काही लोकांची अन्नधान्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे काही लोकांना दिलासा मिळाला आहे. 

परंतु आणखी मदत करण्यासाठी संघटनेला आर्थिक मर्यादा येत आहे. तरी मानवतेच्या दृष्टिकोणातुन केंद्र व राज्य सरकारने अन्न धान्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी असे पत्र क्रांतिसुर्य सामाजिक संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य सरकारला लवकरच देण्यात येणार आहे.

Popular posts
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
कोरोनाचा संसर्गाला रोखण्यासाठी काही मह्त्त्वाच्या उपाययोजना
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image