विना वेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला काँग्रेसने मदतीचा हात


ठाणे :  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र सेवा देत असताना आपल्याला मागील २ महिने पगारच मिळाला नाही म्हणून  अभिनव आंदोलन करणा-या कर्मचाऱ्यांना  काॅग्रेसच्या ओ.बी.सी.विभागाने मदतीचा हाथ पुढे करून एक वेगळाच संदेश दिला.


कोरोना संसर्गाचे ठाण्यातही काही रूग्ण मिळत असताना हा संसर्ग संपूर्ण ठाण्यात फैलावू नये म्हणून ठाणे महानगरपालिकेने ठीक ठीकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली अनेक राजकीय पुढारी ही फवारणी करण्यासाठी पुढे पुढे करताना दिसत होती परंतु ही फवारणी करणारे जे कर्मचारी आहेत ते विना ग्लोवस व मास्क हे काम करत आहेत व त्यांना मागील 2 महिन्यापासून वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून याकरिता शहर काँग्रेस ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी त्यांना मास्क, हँड ग्लोवस सह काही दिवसाचे अन्नधान्यांचा साठा उपलब्ध करून दिला याप्रसंगी ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे हे हि उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की कालच सर्व  वाहिन्यांवर निर्जंतुकीकरण करणारे कर्मचारी आहेत त्यांना 2 महिन्यापासून वेतनच मिळत नसल्याचे वृत्त समजले वास्तविक पाहता ही सर्व कर्मचारी आपण सर्व घरात बसलो असताना वीनावेतन प्रत्येक प्रभागात फीरून निर्जंतुकीकर्णाची फवारणी करण्याकरिता आपला जीव धोक्यात घालून काम करीत असताना ठाणे महानगरपालिकेने यांना वेतनच देऊ नये ही अत्यंत धक्कादायक बाब असून काँग्रेसच्या माध्यमातून मा प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने व प्रदेश ओबीसी विभाग अध्यक्ष प्रमोद मोरे व काँग्रेस चे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.