'अत्यावश्यक सेवे'चा बोर्ड लावून गावठी दारू वाहतूक करणारा टेम्पो मुद्देमालासह जप्त


पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असतानाही अवैध दारू विक्री सुरु असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने अत्यावशक सेवेचा बोर्ड लावून तसेच गाईच्या चाऱ्याचा वापर करून गावठी दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या कारवाईत पोलिसांनी गावठी दारूसह सव्वा सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे अवैध्य दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.बी. टी. कवडे रोड येथील कृष्णानगर मधील चंदू आनंद सासणे याचा गावठी दारूचा अड्डा सुरु असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांना मिळाली. 


त्यानुसार पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग व सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हवालदार काळभोर, पिलाने, साबळे यांनी तेथे पाळत ठेवली.त्यावेळी तेथून जाणारा पांढऱ्या रंगाचा टेम्पो (MH42 / AQ-5784) पोलिसांनी अडविला. या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गावठी दारू आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी गावठी दारूचे भरलेले २५ कॅन (प्रत्येकी ३५ लिटर) एकूण ६७५ लिटर गावठी दारू, याची एकूण किंमत १ लाख २५ हजार रूपये आणि २६०० रुपयांचे २६ रिकामे कॅन, सुझुकी सुपर कॅरी टरबो कंपनीचा टेम्पो असा एकूण ७ लाख ३१ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.


या कारवाईत अवैद्य दारूचा धंदा करणारा चंदू आनंद सासणे (रा. घोरपडी गाव) व त्याचा हस्तक लियाकत अब्बास शेख (वय 32, बालाजी नगर) या दोघांविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पश्चिम) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image