पुणे : रेशनिंग मिळण्यात नागरिकांना प्रचंड अडचणी येत आहेत.अनेक रेशनिंग दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली.
काल आणि आज पुन्हा या दुकानांत ज्या कार्डची नोंद आहे.
त्यांनाच रेशनिंगवरती धान्य देता येईल, असे सांगत कार्डवर शिक्के मारून आणा, असे सांगत धान्य देण्यास नकार दिला आहे.
तर, काही ठिकाणी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात वर्ग करण्यात आलेल्या कार्डधारकांना रेशनिंगचे धान्य देण्यास संबंधित दुकानदारांनी नकार दिला आहे.
हीच अडचण ज्यांनी गेली काही वर्षे रेशनिंगचे धान्यच घेतले नाही त्यांना येत आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री, पुणे विभागीय आयुक्त, पुरवठा अधिकारी यांना मनसेने निवेदन दिले आहे.