मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत - डॉ. आयुक्त म्हैसेकर


पुणे - कोरोनाबाधित रुग्णांचे निधन झाल्यास संबंधित रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत. 


त्या मृतदेहांवर गॅस किंवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


कोरोनाबाधित मृतदेह दफन करायचे असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणून आणि त्यामध्ये र्निजतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये दफन केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.