पुणे विभागात 'कोरोना' चे शतक; १०१ रुग्ण पॉझिटिव्ह


पुणे : पुणे विभागात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आज, शुक्रवारी (दि. ३) सायंकाळ अखेर १०१ झाली आहे. त्यामध्ये पुणे ५७, पिंपरी चिंचवड १४, सातारा ३, सांगली २५ आणि कोल्हापूर २ अशी ही विभागणी असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. गुरुवारी दुपारपर्यंत पुणे विभागातील ही संख्या ८० होती.


डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने २ हजार १८ होते. त्यापैकी १ हजार ८७८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहे. १४० नामुन्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी १ हजार ७७८ नमुने निगेटीव्ह असून १०१ नमुने पॉझिटीव्ह आहेत.


आतापर्यंत १८ रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.


विभागामधील ८ हजार १७८ प्रवाशांपैकी ३ हजार ९९६ प्रवाशांबाबत प्रशासनाचा फॉलोअप सुरू आहे. अन्य ४ हजार २८२ प्रवाशांचा फॉलोअप पूर्ण झाला आहे. आजपर्यंत १५ लाख ६१ हजार ९९२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ७२ लाख ८७ हजार २९१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४९० व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.


रुग्णालयाबाबत बोलतांना विभागीय आयुक्त म्हणाले, पुणे विभागात एकूण ८८ ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकूण १२ हजार ८४८ बेडस उपलब्ध आहेत. तसेच ५२ ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली आहे.


या ठिकाणी एकूण २ हजार १६७ बेडस उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे विभागात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकूण एन-95 मास्क ४९ हजार ८४५, ट्रिपल लेअर मास्क ४ लाख ६९ हजार १९४ एवढे उपलब्ध आहेत. ३ हजार ७८१ पीपीई किट तसेच १२ हजार ९४४ सॅनीटायझर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.


Popular posts
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
Image