कल्याण - कल्याण डोबिवली महानगर पालिका क्षेत्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमेवर कल्याण डोबिवली पालिका आयुक्य डॉ . विजय सुर्यवशी यांच्या आदेशानुसार कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम परिसरातील प्रभाग क्षेत्र अ ब क ड जे व आय या प्रभाग क्षेत्रातील मुख्य रस्ते तसेच गल्लीबोळातील रस्त्यांवरही कसल्पाही प्रकारच्या वाहनांच्या संचाराला बंदी करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार
या आदेशाची अंमलबजावणी आज सायं .६ वाजेपासुन पुढील आदेश येईपर्यंत सुरू रहाणार आहे.
या आदेशामुळे अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांव्यतिरीक्त कोणाचेही दुचाकी -चारचाकी -तिन चाकी वाहन कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही कारणास्तव फिरणार नाही.
या आदेशाचे अल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा सदर आदेशात देण्यात आला आहे.