कल्याण : कल्याण-डोंबिवलीकरांना आता कोरोनासाठी कस्तुरबा रुग्णालयात जाण्याची गरज नाही, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कोरोनाशी लढण्यासाठी यशस्वी पाऊल टाकले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहराच्या ८ ठिकाणी तापाचे दवाखाने सुरू केले आहेत.
त्या दवाखान्यात ताप सदृश लक्षणे आढळल्यास तपासणीसाठी जाण्याचे नागरिकांना आवाहन पालिकेने केले आहे.
त्याचप्रमाणे या रुग्णांचे लक्षणांवरून सौम्य, मध्यम व तीव्र प्रकारात वर्गीकरण करून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात येतील.
कोरोना रोगाची सौम्य लक्षणे दिसून आल्यास कल्याण फाटा येथील एका इमारतीमध्ये या रुग्णांची सोय करण्यात येईल.तेथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असतील त्याचप्रमाणे मध्यम लक्षणे आढळल्यास डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात त्या रुग्णांची सोय करण्यात येईल.
नियॉन खाजगी हॉस्पिटल येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात येईल.
तरी आपण महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.