चिंचवड – केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी ठिक ठिकाणी अडकलेल्या मजुर, कामगार व विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र या मजुरांना मूळ गावी परतण्यासाठी अर्ज करताना आरोग्याचे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ सादर करणे अनिवार्य असणार आहे हे फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत.
लाॅकडाऊनमुळे देशात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. या नागरिकांना आता त्यांच्या मूळ गावी परताता येणार आहे. मात्र यासाठी नागरिक जिथं अडकून पडले आहेत तेथील जिल्ह्याधिकारी आणि जिथे जायचे आहे त्या जिल्ह्याधिकार्यांची परवानगी गरजेजी असणार आहे. या अर्जासोबत नागरिकांना फ्लू चे लक्षणे नाहीत असा मजकूराचे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ सादर करणे अनिवार्य असणार आहे.
दरम्यान हे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातूनच मिळवता येणार असल्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. या रांगेत उभे राहणारे नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकारने रविवारी नवीन नियमावली जाहीर केली असून, या अंतर्गत कंटेनमेंट झोन वगळून रेड, आॅरेन्ज आणि ग्रीन झोन मध्ये दारू दुकानांसहीत इतर उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. दारूच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच नागरिकांनी मोठी रांग लावल्याचे पहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी करणारे नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्क व सोशल डिस्टेंसिंगचे पालन करताना दिसत नाहीयेत त्यामुळे अशाने कोरोना थांबणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.