मुरबाड ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन साजरा


नगराध्यक्षा छायाताई चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम
मुरबाड : आज जगभर कोरोनाचु धामधुम सुरु असताना जगातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणा-या डॉक्टर आणि नर्स यांच्या उपकारातुन उत्तराई होण्याचा दिवस म्हणजेच" जागतिक परिचारीका दिन,, सर्वांना आज कोरोनामुळे त्यांचा विसर पडला आहे.मात्र मुरबाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा छायाताई चौधरी यांनी या दिवसाची आठवण ठेवत,मुरबाड ग्रामीण  रुगणालयातील महिला डॉक्टर,नर्स,वाँर्ड स्टाफ,यांना पुष्पगुच्छ,तसेच जिवनावश्यक वस्तुंचे किट देवून या रुग्णालयात राबराब राबुन अविरतपणे रुगणांच्या आरोग्याची काळजी घेणा-या परिचारीकांचा सन्मान केला.


आज संपूर्ण जग थांबलं असताना जगाच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर,नर्स,परिचारीका,सफाई कामगार, हे आपल्या जिवाची पर्वा न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.त्यांना त्यांच्या  या निस्वार्थी सेवेबद्दल प्रोत्साहन  देवून त्यांचे मनोबल आणि मनोधैर्य वाढवणे हे प्रत्येक  नागरीकाचे कर्तव्य आहे.मात्र प्रत्येक जन आपल्याच जिवाची.काळजी घेतो आहे.हे चुकीचे आहे.हि बाब लक्षात घेवुन नगराध्यक्षा छायाताई चौधरी यांनी मुरबाड चे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा परिचारीका सन्मान कार्यक्रम पार पाडला. त्यावेळी त्यांच्या. सोबत.समाज सेविका अपर्णा.गडे, तसेच माऊली सामाजिक संस्थेचे संतोष (माऊली) चौधरी हे उपस्थित. होते.