कोविड १९ विरोधात लढण्यासाठी ठाणे महापालिकेचा अभिनव उपक्रम पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरोनामुक्त माझा प्रभाग स्पर्धेचे आयोजन


ठाणे : ठाणे शहरामध्ये ‍कोविड १९ चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू नये यासाठी ठाणे महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत, परंतु १०० टक्के नागरिकांकडून ‍नियमांचे पालन केले जात नसल्याने सुमारे ८० टक्के नागरिकांकडून लॉकडाऊनचे पालन करुनसुध्दा सुमारे १० ते २०  टक्के नागरिकांनी पालन न केल्यामुळे ८० टक्‌के नागरिकांचे प्रयत्न विफल होत आहेत. कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाचे ‍ विविध विभाग, महापालिकेच्या प्रयत्नांबरोबरच जनतेचे सर्वतापेरी प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरोना मुक्त प्रभाग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रत्‍येक प्रभाग हा कोरोनामुक्त करणे व त्यानुसार ठाणे शहर कोरोनामुक्त करणे या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने माझा प्रभाग कोरोनामुक्त प्रभाग या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.


ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना


1)  कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी कोविड व नॉन कोविड रुग्णांची सरमिसळ (मिक्सींग) होऊ नये या दोन्ही रुग्णांसाठी वेगवेगळे हॉस्पीटलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.


2)  सिव्हील हॉस्पीटल हे कोविड-19 च्या रुग्णासाठी कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच होरायझन प्राईम, वेदांत हॉस्पिटल घोडबंदर रोड, कौशल्य हॉस्पिटल ही खाजगी हॉस्पिटल हे कोविड-19 च्या रुग्णांसाठी कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.


3)  कोविड सदृश्य लक्षणे दिसत नसलेल्या Mild कॉटेगरीच्या Positive कोविड रुग्णांसाठी भायंदरपाडा येथील डी विंग तसेच हॉटल लेरीडा / हॉटेल जिंजर आणि सफायर हॉस्पिटल, खारीगांव हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहेत.


4)  त्याचप्रमाणे संशयित रुग्णांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संशयित रुग्णांच्या उपचारासाठी भाईंदरपाडा येथे स्वतंत्र बेड, टॉयलेट सुविधा असलेल्या इमारतीमध्ये अशा रुग्णांची स्वतंत्र 1 BHK मध्ये सोय करण्यात आलेली आहे.  तसेच बेथनी हॉस्पिटल हे देखील संशयित रुग्णासाठी घोषित करण्यात आलेले आहे.


5)  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच अन्य काही खाजगी हॉस्पीटल अन्य रुग्णांची गैरसोय होऊ नये यास्तव नॉन कोव्हीड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत.


6)  33 निवडणूक प्रभागांमध्ये फिवर ओपीडी सुरु करण्यात आलेल्या आहेत.  त्यासाठी आयएमए  कडील खाजगी डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करुन घेण्यात आलेली आहे.


7)  बाधित रुग्णांच्या कॉटॉक्टमधील लो रिस्क व हाय रिक्स व्यक्ती शोधून काढण्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी  दिवसरात्र काम करीत आहेत.  जेणेकरुन अन्य ठिकाणी होणारा प्रादुर्भाव संसर्ग थांबविण्यात येईल.


8)  बाधित रुग्ण रहात असलेल्या परिसरातील Containment Plan मधील सर्व रहिवाशांची  कोविड सदृश्य लक्षणाबाबत सर्व्हे करण्यात येतो.


9)  ठाणे महापालिकेच्या सी.आर.वाडीया रुग्णालय येथे कोविड चाचणी लॉब सुरु करण्यात आलेली आहे. सदर सुविधा मोफत असून ICMR आदेशानुसार लक्षणे आढळल्यास तपासणीची शिफारस सक्षम डॉक्टरमार्फत करण्यात येते.


10)कॉडबरी जंक्शन व कळवा खारीगांव येथे " ड्राईव्ह थ्रु " स्वॉब कलेक्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


11)मोठया संख्येने रुग्ण आढळून आलेल्या परिसरास Hot Spot म्हणून घोषित करुन त्याठिकाणी सर्व प्रकारच्या सामान्य गती विधी बंद करुन Home delivery द्वारे जीवनावश्यक वस्तु पुरवठा करण्यात येत आहे.  जेणेकरुन संसर्ग थांबविण्यास मदत व्हावी.


12)यासाठी भारतीय साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करुन विविध आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. नागरिकांकडुन सहभाग मिळणार नाही तोपर्यत अशा विविध उपाययोजना करुनही कोरोना रुग्णांवर प्रभावी नियंत्रण मिळणे शक्य होणार नाही हे विचारांत घेता सर्व नागरिकांनी  शासनाने पारित केलेले नियम / अटींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. 


ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या माझा प्रभाग कोरोना मुक्त प्रभाग या स्पर्धेसाठीचे निकष / अटी / नियम खालीलप्रमाणे राहतील.


या स्पर्धेसाठी 2 मे ते 15 मे व 2 मे ते 29 मे अशी तारीख विचारात घेतली जाईल आणि जून महिन्यात काही ठिकाणी पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर जूनच्या 1 ते 14 व  1 ते 28 तारखांना प्रभाग समिती क्षेत्रातील रुग्णांची संख्या विचारात घेतली जाईल.
      1)  या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱया नागरिकांना Digi Thane च्या https://www.research.net/r/NDW7MSL  या लिंकवर आपले नाव नोंदविणे आवश्यक राहील. तसेच त्यामध्ये प्राथमिक माहिती प्रभाग निहाय नोंदविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांना मोबाईलवरुन सदर लिंकद्वारे जोडता येत नाही अशा नागरिकांना SMS द्वारे, +91-9819170170 नंबरवर उक्त माहिती पाठविणे, नोंदणी करणे आवश्यक राहील. सहभागी होणाऱ्‍या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखिल या लिंक कार्यकर्ते म्हणून वर नोंद करावी.


2)    शासनाकडून दि. 17/04/2020 च्या आदेशान्वये लॉकडाऊनचे आदेश तसेच मा.पोलीस आयुक्त ठाणे यांचेकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेशांचे पालन तंतोतंत करण्याची  प्राथमिक  जबाबदारी  ही  नागरिकांची राहील. लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्याचे  आढळून आल्यास त्याप्रमाणे बक्षीसांची रक्कम कमी जास्त करण्यात येईल.


3)    सद्यस्थितीत लॉक डाऊन असल्याने या स्पर्धेला तज्ञ परिक्षक म्हणून भेट देण्याची आवश्यकता रहाणार नाही.  तथापि गोपनिय स्वरुपात परिक्षक विभागामध्ये पाठविले जाऊ शकतात. पोलीसांचा अहवाल विचारात घेतला जाऊ शकतो.  तसेच ठाणे शहरात विविध रस्त्यावर चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सी. सी.टीव्ही द्वारे याची माहिती घेतली जाईल.


4)    सन्मा. नगरसेवक, समाजातील अन्य प्रतिष्ठीत, नामाकिंत व्यक्ती तसेच विविध पक्षातील कार्यकर्ते, मित्रमंडळ, सामाजिक संघटना यांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने या जन जागृतीमध्ये सहभाग आवश्यक आहे. तथापि, उक्त लॉकडाऊनचे आदेश तसेच जमावबंदीचे आदेश, नियम, शासन निर्णय विचारात घेता, या शासन आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन, केवळ संगणकाद्वारे, whatsapp, facebook, Online video clip, व अन्य online या पध्दतीने नागरीक बाहेर पडणार नाहीत याबाबतची जनजागृती करावी. संबंधित सन्मा. नगरसेवक व अन्य पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या केलेल्या जनजागृतीच्या कामाची  माहिती या लिंकवर पाठविल्यास  त्याचा देखिल स्पर्धेमध्ये विचार केला जाईल.


या स्पर्धेमध्ये प्रत्येक नागरिकांद्वारे  त्यांच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याद्वारे खालील अटींचे 100% पालन करणे आवश्यक आहे. मी/आम्ही असा उल्लेख नागरीकांच्या वतीने खालील वाक्यात करण्यात आला आहे.


 I.     मी शासन नियमांचे, मा.आयुक्तांच्या आदेशांचे  योग्यप्रकारे पालन करीन.


II.     अत्यावश्यक कामाचे व्यतिरिक्त कोणत्याही महत्वाच्या नसलेल्या कामासाठी मी घराबाहेर पडणार नाही.


III.     मी भाजीपाला आणण्यासाठी देखील घराच्या बाहेर पडणार नाही.


IV.     अत्यावश्यक, टाळता येणार नाही अशा कामासाठी घराबाहेर पडताना मी मास्क लावूनच घराबाहेर पडेन.


V.     100% होम डिलीव्हरीद्वारे साहित्य मागविण्याचे आदेशाचे आमच्याकडून पालन करण्यात येईल.


VI.     डॉक्टर आणि नर्स  तसेच स्वच्छता विभाग / वैद्यकीय आरोग्य विभाग, / महापालिका / पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हे आमच्या हितासाठी अखंड्पणे काम करीत असलेने  या सर्वांना मी / आम्ही पुर्णपणे सहकार्य करेन.


VII.     आम्ही प्रभाग रस्त्यांवर गर्दी करणार नाही.


VIII.     अत्यावश्यक, टाळता येणार नाही अशा कामासाठी घराबाहेर पडताना मी सोशल डिस्टनसिंगचे पालन करीन.


IX.     सिल केलेल्या प्रभागाच्या / Containment Plan च्या सीमा ओलांडून मी जाणार नाही.


x.     कुटूंबातील सदस्यांस कोविड सदृश्य कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास तर आम्ही आजार लपवणार नाही


XI.     घरातील कोणीही व्यक्ती आजारी पडल्यास महापालिकेच्या जवळच्या फिव्हर क्लिनीकमध्ये जाऊन तांतडीने माझी / सदर कुटूंबातील सदस्यांची तपासणी करुन घेईन तसेच याबाबतची माहिती  खाली शेवटी यासाठी नमूद केलेल्या लिंकवर पाठविण्यात येईल.


XII.     प्रभाग कोरोनामुक्त ठेवण्यासाठी  प्रभागात  प्रशासनास मी / आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करेन.


XIII.     प्रशासनाने दिलेल्या विहित वेळेतच ग्रोसरी, भाजिपाला मार्केट व अन्य जिवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी राहतील, वेळेबाबतचे आणि शिस्तीचे  पालन आम्ही काटेकोरपणे करु. मेडिकल शॉप वगळता इतर सुविधा विहीत वेळेतच बंद करण्यात येतील.
खालील विविध कॅटेगरीमध्ये स्पर्धेत नागरिकांना सहभागी होता येईल.


1)  सेल्फी स्पर्धा - स्पर्धेमध्ये विषाणूंपासून संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण पध्दती/ कल्पना आपल्या घरात राबविण्यात येत असल्यास त्या कल्पनेसह सेल्फी काढून खाली शेवटी यासाठी नमूद केलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावा.  (उदा. लिफ्टच्या बटनाला डायरेक्ट स्पर्श करण्याऐवजी टुथपिकचा वापर करुन अशा वापरण्यात आलेल्या टुथपिकची सोडीयम हायपोक्लोराईड असलेल्या बिसलेरी  बाटलीमध्ये विल्हेवाट लावणे)


2)  सेल्फ डिकलेरेशन स्पर्धा - आपल्या माहितीपैकी एखाद्या कुटूंबातील एखादा पॉझिटीव्ह रुग्ण ऑडमिट झाला आहे त्याबाबतची माहिती Self Declaration म्हणून संबंधितांनी खाली शेवटी यासाठी नमूद केलेल्या लिंकवर करणे आवश्यक  राहील. कोविड-19 सदृश्य ताप, खोकला, सर्दी, डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्याबाबतची माहिती  या लिंकवर संबंधित कुटूबातील व्यक्तींनी जबाबदारीने शेअर करावा.


3)  Safety clue Video स्पर्धा - कोविड-19 चा प्रादुर्भाव, संसर्ग रोखण्यासाठी त्यापासून बचाव होण्यासाठी नव्याने कोणकोणत्याही उपाययोजना अंमलात आणल्या जातात त्याबाबतची प्रत्येकी एक, 30 सेकंदची व्हिडीओ क्लिप तयार करुन    खाली शेवटी यासाठी नमूद केलेल्या लिंकवर पाठविता येईल.  त्यामधील संदेश परिणामकारकरित्या नागरिकांपर्यत पोहोचणे आवश्यक राहील. मध्ये होईल.


4.1)    Extra Care Safety best Practice Video स्पर्धा (कॉटेगरी 4 ए) - आपल्या कुटूंबाला भाजीपाला, दुध, अन्नधान्य पुरवठा किंवा फुड पॉकेट्स पुरवठा करणाऱया व्यक्तींकडून होम डिलीव्हरीद्वारे प्राप्त वस्तु स्विकारताना (उदा. स्विगी डिलेव्हरी, झोमॉटो डिलीव्हरी याप्रकारे ) सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती विशेष काळजी घेतली जाते याबाबतची टीप/माहिती 30 सेकंदाच्या व्हिडीओद्वार खाली शेवटी यासाठी नमूद केलेल्या लिंकवर पाठविणेत यावा. जेणेकरुन तुमच्या कुटूंबाचा संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही घेत असलेली  काळजी अन्य नागरिकांना देखील कळविणे शक्य होईल.


4.2)    Extra Care Safety best Practice Video स्पर्धा (कॉटेगरी 4 बी) - आपल्या


कुटूंबातील एखादी व्यक्ती भाजीपाला, दुध, अन्नधान्य पुरवठा किंवा फुड पॉकेट्स पुरवठा करण्याचे काम (उदा. भाजीवाला, दुधवाला, किराणावाला किंवा फुड पॉकेट्स पुरवठा करण्याचे काम) करीत असतील तर कोणती विशेष काळजी (Extra Precaution) आपल्या कुटूंबासाठी घेतली जाते याबाबतची टीप/माहिती 30 सेकंदाच्या व्हिडीओद्वारे खाली शेवटी यासाठी नमूद केलेल्या लिंकवर पाठविणेत यावा.


4.3)    Sensitive Service Extra Care Safety best Practice Video स्पर्धा (कॉटेगरी 4 सी)-  आपल्या कुटूंबातील एखादी व्यक्ती डॉक्टर, नर्स, वार्डबॉय किंवा स्वच्छता विभाग / वैद्यकीय आरोग्य विभागात काम करीत असतील तर कोणती विशेष काळजी (Extra Precaution) आपल्या कुटूंबासाठी घेतली जाते याबाबतची टीप/माहिती 30 सेकंदाच्या व्हिडीओद्वार खाली शेवटी यासाठी नमूद केलेल्या लिंकवर पाठविणेत यावा.


5.1)  संपूर्ण प्रभाग समिती कॅटेगरी - भाग 1
1)  दि. 1 ते दि. 14 या तारखेच्या कालावधीमध्ये प्रभाग समिती क्षेत्रात कोणताही नवीन रुग्ण पॉझिटीव्ह आला नाही.
आणि
2)  प्रभाग समिती क्षेत्रातील सध्याचे सर्व Positive रुग्ण Negative होऊन Discharge झाले  तर अशा प्रभागामध्ये प्राथमिक विकास कामांसाठी 25 लक्ष निधी


5.2) संपूर्ण प्रभाग समिती कॅटेगरी - भाग 2
1)  दि. 1 ते दि. 28 या दरम्यान कोणताही नवीन रुग्ण पॉझिटीव्ह आढळला नाही. 
आणि
2)  जेवढे पॉझिटीव्ह आहेत ते Negative होऊन Discharge  झाले अशा प्रभाग समितीस  (कॉटेगरी 5.1 चा पुरस्कार मिळालेला वगळता ) विशेष पुरस्कार म्हणून 50 लक्षविकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्यात येईल.


मा.आयुक्त यांचे अधिकारांतर्गत, उपरोक्त निकष पूर्ण करणाऱया प्रभाग समितीस रक्कम रुपये 50 / 25 लक्षचा निधी प्रभाग समितीच्या शिफारशीनुसार प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक विकास कामांसाठी उपलब्ध करुन दिला जाईल. 


ज्या नागरिकांकडून सक्रिय सहभाग नोंदविला जाईल अशा नागरिक / नगरसेवक  यांना प्रशस्तीपत्रक  देऊन गौरविण्यात येईल.  त्यांना कोविड विरुध्द लढवय्ये म्हणून गौरविण्यात येईल.


उपरोक्त नाविन्यपूर्ण व कल्पक उपाययोजना राबविण्याऱया व्यक्तीं काहींची निवड करुन त्यांना विशेष पारितोषिक / मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.


तरी सर्व ठाणेकर नागरिकांनी या स्पर्धेसाठी सहभागी व्हावे. स्वतः सुरक्षित रहा. सर्व ठाणेकर नागरीकांनी आपल्या कुटूंबियांसह आप्त, स्वकीय, मित्रमंडळी आणि सर्व ठाणेकरांना सुरक्षित ठेवण्यामध्ये आपला मोलाचा सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त विजय सिंघल यांच्यावतीने करण्यात आले आहे.


घरी रहा, सुरक्षीत रहा, कोरोना मुक्त रहा.


 स्पर्धेसाठी खालील लिंक वर नोंदणी फोटो/व्हिडीओ अपलोड करावे


1.  कवच नोंदणी - httpsः//bit.ly/rKTMC


2.  कोव्हिडच्या खबरदारीविषयी  सेल्फी स्पर्धा – https ://bit.ly/SeKch


3.  डिजी ठाणे ऑप - httpsः//bit.ly/ThDig


4.  सेल्फ असेसमेंट लिंक - https://bit.ly/TMCaa


5.  DigiThane WhatsApp Number for sending Videos +91-9819170170 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.