मुरबाड पोलीसांच्या सहका-याने बँक मँनेजरने लावली खातेदारांना शिस्त               


मुरबाड : संपूर्ण देश आज कोरोना विषाणूच्या विरोधात लढत आहे. त्यासाठी देश कित्येक दिवस लाॕकडाऊन आहे. कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे.


परंतु अजूनही काही ठिकाणचे नागरिक गांभीर्याने घेताना दिसत नाही. मुरबाड तालुका सध्या कोरोना मुक्त असला तरी सूद्धा शासनाच्या नियमांचे पालन करायलाच पाहीजे . ते होत नसल्याचे सरळगाव येथिल ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेत  येणारे खातेदार माञ कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टंक्शीन चे पालन न करता गर्दी करत असल्याचे चिञ दिसुन येत होते. ही गोष्ट दैनिक ठाणे जिवनदीप वार्ता चे पञकार दिलीप पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी ही गोष्ट बॕकेंचे व्यवस्थापक कैलास कोर यांच्या लक्षात आणून दिली.व मुरबाड पोलीस ठाण्याचे  पोलीस निरिक्षक दत्ताञय बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता  बोराटे साहेबांनी  तात्काळ  बॕकेच्या मदतीसाठी पोलीसांना पाठवून बॕक कर्मचारी व पोलीस यांनी गर्दी हटवून त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्स राखून लोकांना सुरक्षित अंतरावर उभे राहण्यास सांगितले.            


अशाच प्रकारे मुरबाड ,धसई या ठिकाणच्या शाखेमधे सूद्धा खातेदारांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. टि.डी.सी.बॕक जरी शेतकर्यांची बॕंक असेल तरीही शेतकर्यांनी शासनाचे नियम पाळायलाच हवेत . साध्या - साध्या कामासाठी शेतकर्यांनी बॕकेत  गर्दी करु नये. कैलास कोर - शाखा व्यवस्थापक ,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.,सरळगाव.