पाणीटंचाईग्रस्त गावांना टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा !! अन्यथा तीव्र आंदोलन करणार - चेतनसिंह पवार


मुरबाड : शुक्रवार,दि. ८ मे २०२० रोजी मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये व राहुलजी गांधी विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, नेताजी लाटे, शेतकरी आघाडीचे दिनेश जाधव, आदिवासी आघाडीचे कार्याध्यक्ष दिपक चिडा यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. तालुका पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये, आदिवासी बांधवांच्या वाडी, वस्ती तसेच पाड्यावर पाणी टंचाई तीव्रतेने भेडसावू लागली आहे. पाणीटंचाई ग्रस्त गावामधील माता-भगिनी ह्या काही किमीवरुन डोक्यावर हंड्यातुन खड्यातुन, तलावातून तसेच विहीरीमधुन दुषित पाणी आणतात त्यामुळे प्रचंड रोगराई पसरु शकते. सदरच्या मागणीचा विचारकरुन मागील वर्षामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातुन केलेल्या पाणी पुरवठाचा मागोवा घेवुन पाणीटंचाई ग्रस्त गावामध्ये पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा टॅंकरव्दारे युध्द पातळीवर करण्यात यावी अन्यथा स्थानिक पंचायत समिती प्रशासनाविरुध्द काॅंग्रेस पक्ष तीव्र आंदोलन असा इशारा चेतनसिंह पवार यांनी दिला. दिलेल्या मागणीनुसार गरज असलेल्या गावात तात्काळ टॅंकर वाढवुन देण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक असल्याचे गटविकास अधिकारी अवचार यांनी सांगितले.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image