कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ति वाढवा - रामदेव बाबा


मुंबई – कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. निरोगी रहाण्यासाठी अनुलोम-विलोम, भस्रिका कपालभाती, योगासनाने श्वास घेण्याची व फुफ्फुसाची क्षमता वाढून शरीर बळकट होईल. तसेच सात्विक आहार घ्यावेत, आयुर्वेदिक काढे गुळवेल आदी वनस्पतींपासून बनविलेले काढे घेणे लाभदायक ठरते, असे मार्गदर्शन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले.


डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठामार्फत योगगुरु रामदेव बाबा यांच्याबरोबर बुधवारी ’योग वेब कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली. सद्य परिस्थितीत सर्वत्र कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य डळमळीत होऊन त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी, मनोबल वाढविण्यासाठी, विशेष म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्याच्या उद्देशाने या ’वेब कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले.


या कॉन्फरन्ससाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. सौ. स्मिता जाधव, खजिनदार आणि विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे योग गुरु रामदेव बाबा यांच्याशी संवाद साधला.


’वेब योग कॉन्फरन्स’मध्ये प्राचार्य डॉ. गुणवंत येवला यांनी डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या आयसोलेशनची व्यवस्था नियोजित आहे. आयसोलेट रुग्णांनी बेडवरच कुठल्या प्रकारची आसने व प्राणायाम करता येतील ? प्राचार्य डॉ. शर्मा यांनी या परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य कसे राखता येईल?, डॉ. भवाळकर यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या कर्मचार्‍यांची सुरक्षा, डॉ. गोपालकृष्णन यांनी दन्त रोगावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी प्रतिकार शक्ती कशी वाढवावी?, उप प्रा. डॉ. प्रशांत खाडे यांनी कोरोनाच्या लढवय्यांसाठी आपण काय संदेश द्याल? असे प्रश्न विचारले. याची सविस्तवर उतरे रामदेव बाबा यांनी दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साफिया फारुकी यांनी केले. विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांनी आभार मानले.


Popular posts
‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा श्री. संजीव जयस्‍वाल यांनी पदभार स्‍वीकारला
Image
हॅाटेल प्रिन्स आयसोलेशनसाठी अधिगृहित महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला निर्णय
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image