मुंबई - कोरोनाच्या वाढत्या संक्रमणा नंतर,खबरदारी घेत देशातील विविध कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे.
दरम्यान मुंबईच्या आर्थर रोड आणि साताऱ्याच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने प्रवेश केला आहे.
कारागृहातील कैद्यांबरोबरच मुंबईच्या जेलमधील पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
यामुळे कारागृह प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.