संस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा!


लढा कोरोनाशी, नातं मानवतेशी !


ठाणे : संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू या महामारीशी लढा देत असून सर्वत्र जैविक विषणू विरुद्धची युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. माणसाचे माणसाशी असलेले मानवतेचे नाते जपण्याचं महान कार्य सध्या देशांत सर्वत्र दिसून येत आहे. कोरोना विषाणू विरुद्ध लढणारे आपले सरकार, जीव धोक्यांत घालून कर्तव्य बजावणारे डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पोलीस दल, वाहतुक शाखा हे खरे म्हणजे आपले देवदूतच आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण कोरोनामुक्त किंवा सुरक्षितदृष्ट्या सुरक्षित आहोत. त्यामध्ये संपूर्ण देशभर लॉकडाऊन केल्याने हातावर पोट असणा-यांचे रोजगारच बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली दिसून येत आहे अशा बिकट परिस्थितीत नागरीकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून शक्य होईल तसे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मानवतेचे नाते जपण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेना, शाखा बाळकुम व जनहित फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कारक्षम शिवसैनिकांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत बाळकुम परिसरांतील नागरीकांसाठी विनाशुल्क जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन आपल्या बांधवांप्रति स्नेहभाव व्यक्त करीत आपला खारीचा वाटा उचलला.


शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे संयमी, सक्षम व कार्यतत्पर मुख्यमंत्री आदरणीय ना.श्रीमान उद्धवजी ठाकरे
साहेब व शिवसेना नेते, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री, नगरविकास मंत्री तथा ठाणे जिह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व ठाण्याचे महापौर, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केलेल्या आवाहनानुसार संस्कारक्षम निष्ठावान शिवसैनिक भारतीय विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक व जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल पाटील व शाखाप्रमुख संतोष भोईर यांनी पुढाकार घेवून बाळकुमवासीयांना प्रति व्यक्ति एक किलो उत्तम प्रतीची तुरडाळ, एक किलो प्रिया सनप लॉव्हर ऑईल एक किलो साखर, चहा पावडर, यीप्पी पास्ता व यीप्पी नूडल्स या जीवनावश्यक वस्तूंचे विनाशुल्क वाटप केले. यावेळी नागरीकांनी मास्क लावून व सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करुन जीवनावश्यक वस्तूंचा स्विकार केला.


यावेळी बोलताना भारतीय विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक व जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी सांगितले की, कोरोना विषाणू हे आपल्या देशावरील व कुटुंबावरील आलेले एक भयावह जैविक संकट असून आपण सर्वांनी निर्धाराने हे कोविड-19 विरुद्धचे युद्ध जिंकायचे आहे, त्यासाठी सर्वांनी सतर्क व जागरुक राहून घरीच रहा असे आवाहन केले. याकरीता मुथ्थुट फायनान्य ग्रुप व आयटीसी चे फार मोठे सहकार्य लाभले. या सामाजिक उपक्रमाबद्दल बाळकुममधील नागरीकांनी समाधान व्यक्त करत संयोजकांचे कौतुक करुन धन्यवाद दिले.


या उपक्रमांस भारतीय विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक व जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल पाटील व शाखाप्रमुख संतोष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री अजय पाटील, जालींदर पाटील, मुरलीधर कोटकर, प्रथमेश पाटील, मयुरेश पाटील, हितेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मुथ्थुट फायनान्स ग्रुपचे ठाणे प्रमुख अमित विश्वकर्मा, सुप्रसिद्ध समालोचक व निवेदक बंटी देसाई व मकरंद सारोळकर, उपशाखाप्रमुख लक्ष्मण सुर्यवंशी, मधुकर भोईर, प्रकाश हजारे, गजानन भोईर, दयानंद हजारे, मनोहर हजारे, कृष्णा पाटील, अशोक पाटील, दिलीप माने, नामा परदेशी, दिनेश पाटील, भूषण पाटील, यतिश पाटील, अमित पाटील, निळकंठेश्वर महिला मंडळाच्या सदस्या निर्मला पाटील, रविता पाटील, शर्मिला पाटील, निर्मला पाटील, आशा पाटील, वर्षा पाटील, सुर्यकला पाटील, कल्पना पाटील, मनिषा पाटील, भार्गवी पाटील, किमया पाटील, ऋषिकेश पाटील आदींनी मोलाचे सहकार्य केले.आपला स्नेहांकित


सुनिल पाटील ठाणे जिल्हा संघटक


अध्यक्ष- जनहित फाऊंडेशन, ठाणे.