लोहारमाळ रिक्षाचालक मालकांना आ.गोगावलेंतर्फे किराणामाल वाटप

 


पोलादपूर : तालुक्यातील लोहारमाळ येथील शंकर मंदिरामध्ये रिक्षा चालक मालक संघटनेला महाड विधानसभा मतदार संघाचे आ.भरत गोगावले यांच्यातर्फे किराणामालाचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, पोलादपूर शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे, दशरथ उतेकर, ज्येष्ठ शिवसैनिक रामचंद्रदादा साळुंखे, लोहारेचे माजी सरपंच प्रदीप सुर्वे,दिविलचे माजी सरपंच किसन थिटे तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


यावेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, आ.भरतशेठ गोगावले यांच्याकडून मुंबईकर चाकरमानी तसेच गरजू ग्रामस्थांसाठी सरसकट किराणा मालाचे वाटप केले जात असताना कोणताही राजकीय भेदभाव न करण्याचे आदेश झाल्याने खऱ्या अर्थाने मानवसेवेचे कार्य या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असल्याचे सांगितले.


सुमारे पन्नासहून अधिक रिक्षा चालक मालकांनी या किराणा माल पॅकेटसचा लाभ घेतला.याप्रसंगी सर्व रिक्षा चालक मालकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून हाताला सॅनिटायझर लावून तसेच रबरी हातमोजे घालून किराणा मालाची पॅकेटस् स्विकारण्यासाठी शिस्तबध्द उपस्थिती दर्शविली.