ध्रुवा फाउंडेशन तर्फे मुलांना शैक्षणीक साहित्य वाटप


वाडा : कुडूस येथील जिल्हा परिषद शाळा मल्याण पाडा येथे ध्रुवा फाउंडेशन च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष पत्रकार अनिल पाटील यांनी  मान्यवरांच्या उपस्थित अशी घोषणा केली की या शाळेतील एका विद्यार्थीला त्यांनी दत्तक  घेतले. त्या विद्यार्थीचा संपुर्ण शैक्षणिक खर्च संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
कुडूस येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मल्यांणपाडा येथे गोरगरीब मुलांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमास नित्यानंद सेवक रामचरण नाईक, ध्रुवा फाउंडेशनचे अनिल पाटील, सचिव अर्पिता पाटील,  जयेश घोडविंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक काळे सर, सांबरे मडँम उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या अर्पिता पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.
यावेळी उपस्थित मार्गदर्शन करताना अनिल पाटील यांनी असे सांगितले की त्यांनी मुलीच्या वाढदिवस निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु या पुढेही कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांना कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते संस्थेच्या  माध्यमातून कार्य करणार आहेत. कारण कुठलाही मुलगा-मुलगी शिक्षणापासुन वंचित राहता कामा नये या साठी ही संस्था कार्य करणार आहे.