राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या


राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना प्रश्न घेऊन राज्यात गेल्या १५ वर्षापासून कार्यरत आहे  आमदार संजय केळकर साहेब सातत्याने उत्तर त्यांच्या प्रश्नांचा व त्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्याच कार्याचा भाग म्हणून आज आमदार संजय केळकर व राज्य वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्या निवेदनाद्वारे सादर केलं.


या सर्व मागण्यांचा साकल्याने विचार करण्यासाठी व त्यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी अधिवेशनानंतर लवकरात लवकर बैठक आयोजित करून संबंधित अधिकाऱ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात येईल असे आश्वासन कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.