देश तोडणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करा: अमित शहा


कोलकाता: जे लोक देश तोडण्याचे काम करत आहेत, अशांच्या मनात भय उत्पन्न करणे हे राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे (एस एसजी) काम आहे असे वक्त व्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. जर हे लोक आताही ऐकत नसतील तर एनएसजीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असेही शहा म्हणाले. गृहमंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या राजारहाट येथे एनएसजीच्या २९ व्या स्पेशल कंपोझिट ग्रुपचे उद्घाटन केले. त्यानंतर केलेल्या संबोधनादरम्यान त्यांनी हे विचार मांडले आहेत.माझ्यासाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. एनएसजीसाठी ज्या ज्या सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व देण्याच्या दृष्टीने आम्ही एक एक पाऊल पढे टाकत आहोत, असे शहा म्हणाले. या वेळी अधिक माहिती देताना अमित शहा म्हणाले की, एकाच वेळी सुमारे २४५ कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लोकार्पण आण भूमिपूजन करण्याचे काम झाले आहे. पाच वर्षांमध्ये एनएसजीने भारत सरकारकडून केलेल्या अपेक्षांची पूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.