आजच्या महिला या काही ठिकाणी पुरूषापेक्षाही अधिक प्रभावी ठरत आहेत


ठाणे : आजच्या महिला या काही ठिकाणी पुरूषापेक्षाही अधिक प्रभावी ठरत आहेत फक्त महिला दिवस साजरा न करता फक्त सहकारी महिला कर्मचार्‍यांना समानतेची वागणूक दिली तरी खूप आहे असे ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले ठाणे नगर पोलिस स्टेशन च्या हद्दीत विविध शासकीय आस्थापने असल्यामुळे या पोलिसांच्या वर कामाचा मोठा ताण असतानाही महिला पोलीस सक्षम पणे त्याला सामोरे जात असल्याचे लक्षात येते असेही त्यांनी सांगितले.


8 मार्च जागतीक महिला दिनानिमित्त ठाणे जिल्हा इंटक(INTUC)च्या वतीने ठाणे नगर पोलिस स्टेशन मधील कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार समारंभ ठाणे नगर पोलिस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ठाणे महानगरपालिका उपमहापौर पल्लवी कदम, जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे,जेष्ठ काँग्रेस नेते राम भोसले,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील, पोलिस निरीक्षक देशमुख साहेब, वाळंबेसाहेब, ठाणे काँग्रेस ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, शहर काँग्रेस सरचिटणीस शिरीष घरत, युवा नेते महेश पाटील सचिव अजिंक्य भोईर, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल भोईर, विनित तिवारी, अजित ओझा, युवक काँग्रेसचे प्रविण खैरलीया,अकुश चिडल्या, अतिश राठोड, अजय चिडालिया आदि पदाधिकारी उपस्थित होते.