होळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी


आपली परंपरा व संस्कृती जपत येणारा प्रत्येक सण ज्या जल्लोषात उत्साहात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातील काय मुंबई,ठाणे,नवी मुंबई या शहरात कामानिमित्त स्थायिक झालेल्या प्रत्येकालाच या कोळीवाडा गावठाणात जायचं असतं पहायचं असत की येथे राहणारा मुंबईचा आद्य रहिवाशी भूमिपुत्र आपले सण कसे साजरे करतो ते !  देशी असो  काय विदेशी पर्यटकांना सुद्धा ओढ असते ते या भूमिपुत्रांचे सण कसे साजरे करतात ते ! . दाटीवाटीत राहणारे कष्ट करून आपले जीवन जगणारे व कितीही संकट आली तरी ती चेहऱ्यावर दुःख, चिंता न दाखविता येणार प्रत्येक सण, उत्सव येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे हसत मुखाने स्वागत करून त्याचा योग्य तो पाहुणचार करून आपल्या सणाच्या आनंदात त्या पाहुण्याला पण सामील करून साजरे होणारे सण पाहायचे असतील तर कधीही भेट द्या आमच्या गावठणांना,कोळीवाड्यांना पाड्यांना.
मगच कळेल की किती ही संकट आली समस्या आल्या तरी न डगमगता सर्वांनी एकत्र येऊन,सर्वांना एकत्र घेऊन चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन न डगमगता संकटांना समोरे कस जायचे ते आणि हे सर्व होत असताना येणारा आपला प्रत्येक सण असा आनंदात उत्साहात साजरा करायचा ते या गावठाण,कोळीवाड्यांच्या मातीत जन्मजात शिकवले जाते.

अरे जोय जा, अरे जोय जा,
जोय जाय जोय जाय जोय जा
बारा महिन्यांशी ये शी हौलू बाय गो, बारा महिन्यांशी ये शी  हौलु बाय

सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला
चला हौली भवती नाचा हो, हौली भवती नाचा.

आमचे दाराशी हाय शिमगा
आमचे दाराशी हाय शिमगा
सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावानं

आता ही आणि अशीच कितीतरी लोकगीत आता होळीच्या सणाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्येक गावठाणात,  कोळीवाड्यात, गावा गावात आता आपल्याला ऐकायला मिळणार आणि मोठ्या उत्साहात व जल्लोषात भूमिपुत्र साजरा करणार आपला शिमग्याचा (होळीचा) सण आज एक नाही असंख्य संकट आली आहेत ठाणे, मुंबई,नवी मुंबईतील सर्व कोळीवाडे, गावठाणात, पाड्यात राहणाऱ्या या आपल्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर पण या सर्व संकटांना तोंड देत देत आपल्या गावात आपल्या दारात काय तर घराघरात साजऱ्या होणाऱ्या आपल्या प्रत्येक सणाचा आनंद घ्यायचा आणि तो इतरांनाही कसा घेता येईल याचा विचार करून कितीही संकट आली तरी  हे असं आनंदाने हसत खेळत जगायला लागते ती खरी जिगर, हिम्मत  आणि ती जिगर आणि  हिम्मत  इथे राहणाऱ्या प्रत्येक भूमिपुत्र बांधव, माता, भगिनी,तरुण तरुणींन मध्ये ठासून भरलेली आहे.
या सणाच्या निमित्ताने आता सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी तसेच लोकप्रतिनिधी गावा गावात होळी ना सदिच्छा भेट देण्यासाठी येणार. त्यांचा उचित आदर सत्कार कुठे केला जातो व या सणाचा आनंद कुठे घेतला जाऊ शकतो तर त्याचे  एकच ठिकाण आहे  ते म्हणजे आमचे कोळीवाडे , गावठाण व पाडे  पण या सर्व नेत्यांना हा विसर कसा पडतो जर हे कोळीवाडे आणि गावठाण जर राहिली नाहीत. विकासाच्या ओघात नकाशा वरून पुसून च टाकली तर या होळीच्या सणाचा मान घेण्यासाठी गावांच्या होळींना फेरे मारण्यासाठी पाहुणचार घेण्यासाठी जाणार तरी कुठल्या गावात ? जर ही गावच राहिली नाहीत तर ! प्रत्येक पक्षाच्या नेत्याने हा विचार करण्याची आज खरी गरज आहे ते नेते कधी करणार आपला विचार कधी घेणार आपली दखल का घेणारच नाहीत कधीही  ?  या आपल्या होळीच्या  सणाच्या निमित्ताने आता ती आपण सर्व भूमिपुत्रांनी त्यांना करून द्यायची वेळ आली आहे. आपली सर्व गाव ती करून देतीलच.
 मुंबईतील कोळीवाडा, गावठाण मधील भूमिपुत्रांच्या किती समस्या आहेत विकासाच्या अट्टा हसा  पाळी त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कोस्टल रोड, सी लिंक हे  प्रकल्प किनाऱ्या क्षेत्रातील सर्व कोळीवाड्याच्या मानगुटीवर आहेत आणि एक दुसरी लढाई सुरू आहे ती गावठाण, कोळीवाड्यांचे सिमांकन कधी होणार याची , सागरी किनारा क्षेत्र प्रारूप नकाशे  CZMP च्या प्रसारित झालेल्या नकाशात आज देखील कोळीवाडे गावठाण आणि त्याच्या वापराच्या , वाहिवाटीच्या जागा दाखविल्या नाहीत. का बरं ? या मुंबईतील आद्य रहिवाशी भूमिपुत्रांना ओरडून ओरडून सांगावे लागत आहे की आम्ही झोपडपट्टी नाही आमच्या येथे कधीही झोपडपट्टीत राबविण्यात येणारी SRA किंवा क्लस्टर योजना राबवू नका. का त्रास होतो तुम्हाला आमच्या अस्तित्वाचा या मुंबईचा जगाच्या नकाशावर विकास होत होता तेव्हा आपल्या जागा जमिनी दिल्या त्या येथे राहत असलेल्या भूमिपुत्रांनी आणि आता तुम्हाला त्यांचाच त्रास होतो आहे.  हे सर्व प्रश्न विचारा आप आपल्या प्रत्येकाच्या कोळीवाड्यात गावठाणात होळी निमित्त आदर सत्कार घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना सर्व पक्षीय नेत्यांना
 प्रत्येक कोळीवाडा गावठाण मध्ये शिमगा (होळी) साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा आहे संस्कृती आहे आणि ते ते गाव आज पर्यंत आपल्या त्या परंपरा व संस्कृती टिकवून आहेत. काही गावात गावाची एकच होळी असते,काही गावात दारा दारात होळी पेटवली जाते,काही गावांनी एक गाव  एक होळी ही संकल्पना राबवली आहे. वरळी कोळीवाड्याची  होळी, खार दांडा कोळीवाड्याची होळी सर्व शृत आहेच  प्रसिद्ध सुद्धा आहेत. तसेच भांडुप गावात होळीच्या एक दिवस आधी रात्रीच्या वेळी  गावातून विविध प्रकारची सोंग काढून वेगळ्या प्रकारे होळी साजरी केली जाते.  असा हा विविध रंगाचा सण प्रत्येक गावा गावात विविधतेने साजरा केला जातो.काही गावात गावातील भगिनी माता एकाच रंगाच्या साड्या घालतात काही माता भगिनी पारंपारिक वेशभुषा परिधान करतात.   गावातील तरुण पारंपारिक वेशभूषा परिधान करतात तर काही गावातील तरुण एकाच रंगाचे टी शर्ट घालतात.हे सर्व करण्या मागील उद्देश एकच असतो तो म्हणजे विविधतेत एकता हाच संदेश देण्याचा हेतू असतो.भले आम्ही रंग, रूप,आकार यांनी वेगवेगळे असू पण आम्ही सर्व एक आहोत आणि आमचा गाव एक आहे आणि या एकिनेच आम्ही आमचे सण साजरे करणार.  आज या एकीनेच आप आपल्या गावांवर आलेल्या सर्व संकटांना तोंड देण्याची संकटांना समोरे जाण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील सर्व गावठाण कोळीवाड्यातील भूमिपुत्रांनी या आपल्या सणाला आपल्या गावात येणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना सर्व पक्षांच्या नेत्यांना पाहुणचार देताना हे प्रश्न नक्की विचारा साहेब ही आमची गाव राहिली तरच आम्ही राहू आमचे अस्तित्व टिकून राहील आमचे सण साजरे होतील पण जर ही गावं राहिली नाहीत तर आम्हीच राहिलो नाहीतर हे सण साजरे करण्यासाठी, पाहुणचार घेण्यासाठी आपण जाणार कुठे ? म्हणूनच अतिशय नम्रपणे विचारतो साहेब लेखी शासन निर्णय GR गावठाण, कोळीवाडे,पाडे क्लस्टर योजनेतून वगळले आहेत असा शासन निर्णय (GR) कधी निघणार? CZMP च्या प्रसारित होणाऱ्या नकाशावर आमची गावठाण कोळीवाडे आमच्या वाहिवाटीच्या वापरातील जागा दाखविणार कधी ? आमच्या विस्तारित गावठाण कोळीवाडे याचे विस्तारित सिमांकन  कधी सुरू करणार? आमच्या कोळीवाडा गावठाणासाठी नवीन विकास नियंत्रण नियमावली DCR कधी बनविणार? आमच्या भूमिपुत्रांच्या शाश्वत विकासासाठी शासन नवीन योजना कधी आणणार ? वरील आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या आपल्या सर्व पक्षीय नेते मंडळी पाहुण्यांच्या कडून नक्की घ्या.आणि गात नाचात आनंदात साजरा करा आपला शिमगा आपली होळी.
आमचे दाराशी हाय शिमगा
आमचे दाराशी हाय शिमगा
 सन  शिमग्याचा आयलाय रे आमचे गावानं

ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समिती
कोळीवाडा गावठाण सेवा समिती
गिरीश साळगांवकर  9820887755