कोरोना व्हायरस--सत्य आणि असत्य
- डॉ. अविनाश ठाकूर देसाई
सध्या मोठा चर्चेत असलेला विषय म्हणजे कोरोना व्हायरस!
माध्यमातून उलटसुलट बातम्या व संदेश येत आहेत.
चला तर थोडेफार जाणून घेऊ.
2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान प्रांतामधे एका विशिष्ठ प्रकारच्या न्युमोनियाच्या अनेक केसेस अचानक दिसून आल्या.
मच्छी व जिवंत प्राणीबाजारात काम करणाऱ्या लोकांमधे ह्याचा प्रादुर्भाव दिसून आला.
हा एक प्रकारचा विषाणू असून त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
ह्या नव्या विषाणूचे नाव आहे 2019 nCoV अर्थात 2019 novel (नवा) कोरोना व्हायरस.
कोरोना म्हणजे मुकूट.
ह्या व्हायरसची संरचना एका काटेरी मुकुटाप्रमाणे आहे.
सुरूवातीच्या काही केसेसच्या संपर्कात आलेले कुटुंबीय व वैद्यकीय कर्मचारी ह्यांमध्ये हळूहळू हा विषाणू पसरला. तसेच प्रवाशांमार्फत आजूबाजूचे प्रदेश तसेच दूरचे देश येथेदेखील काही प्रमाणात हा विषाणू पसरला.
आता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही गोष्टी आता जाणून घेऊ या.
आपल्याला यामुळे घाबरून जाण्यासारखं काही आहे का?
*तर अजिबात नाही.*
सर्वांना कोरोना विषाणूची तपासणी करणे गरजेचे आहे का?
*अजिबात नाही.*
मग ही तपासणी कोणी करून घ्यावी?
जे कोरोना विषाणू रोगाचे प्रस्थापित रुग्ण आहेत, त्यांच्या संपर्कात आलेले व स्वतः आजारी असलेले यांनीच फक्त ही तपासणी करून घ्यावी.
प्रस्थापित रुग्ण म्हणजे कोण?
जे आजारी आहेत व ज्यांची कोरोना विषाणू चाचणी पाॅझिटिव्ह आली आहेत ते प्रस्थापित रुग्ण.
असे प्रस्थापित रुग्ण भारतात किती आहेत?
*एकही नाही.*
मग त्या केरळमधील विद्यार्थ्यांचं काय?
वुहान येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे केरळचे काही विद्यार्थी आपल्या गावी परतले. त्यांना कुठलाही आजार नव्हता. केवळ औपचारिकता म्हणून त्यांची कोरोना विषाणू तपासणी केली. त्यापैकी तिघांची चाचणी पाॅझिटिव्ह आली.
पण म्हणजे त्यांना हा रोग झालाय का?
*बिल्कुल नाही.*
त्यांना फक्त संसर्ग झाला आहे. कुठच्याही प्रकारचा साधा सर्दी खोकलाही नाही.
त्यांना सर्दी झाल्यास डाॅक्टरना भेटायला सांगितले आहे.
ही रक्ताची चाचणी आहे का?
*नाही. ही चाचणी घशातील स्त्रावांची आहे.*
या चाचणीचे नाव काय?
*ह्याला nCoV,PCR(Polymerase chain reaction) असे म्हणतात.*
ही चाचणी खाजगी प्रयोगशाळांमधे होते का?
*नाही.*
*उगाच ह्या चाचणीचे व्यापारीकरण होऊ नये म्हणून खाजगी प्रयोगशाळांना अजून तशी परवानगी देण्यात आलेली नाही.*
मग ही चाचणी कुठे होते?
*पुण्याच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजी येथे ही चाचणी होते.*
मुंबईमधे कुठे ही चाचणी होते का?
हो मुंबई महापालिकेच्या संसर्गजन्य रोगांच्या *कस्तुरबा रुग्णालयात* ही चाचणी केली जाते.
या विषाणूचा incubation period किती आहे?
ह्याचा incubation period 2 ते 11 दिवस आहे.
तपासणीचा report यायला किती वेळ लागतो?
मांसाहार टाळणे गरजेचे आहे का?
सध्या तरी तशी गरज नाही. निरोगी, स्वच्छ व नीट शिजवलेला मांसाहार करणे वर्ज्य नाही.
ह्या रोगाविषयीची माहिती कुठे मिळेल?
*ही माहिती WHO.Coronavirus ह्या वेबसाईटवर मिळेल.ही माहिती दररोज update केली जाते.*
आपण हा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
1.नेहमी जवळ रूमाल बाळगावा.
2.खोकणाऱ्या रूग्णाशी जवळचा संपर्क टाळावा.
3.स्वतःला बरे नसल्यास इतरांशी जवळचा संपर्क टाळावा.
4.नेहमी हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
5.अन्न शिजवूनच खावे.कच्चे खाऊ नये.
6.ताप,सर्दी,खोकला झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
7.अफवांना बळी पडू नये.
8.कोरोनाविषयी अद्ययावत माहिती हवी असल्यास *WHO Website चा आधार घ्यावा.* ह्या वेबसाईटवरील माहिती नियमितपणे update केली जाते.
9.तरीही काही शंका असल्यास त्यांचे निरसन आपल्या डाॅक्टरांकडून करून घ्यावे.
भारतीय नागरिकांसाठी ही माहिती कुठे उपलब्ध आहे?
*भारत सरकार-आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय-Diseasealerts-Novel Coronavirus ह्या लिंकवर ही माहिती उपलब्ध आहे.*
ह्या विषाणूवर प्रतिबंधक लस उपलब्ध आहे का?
हा विषाणूच नवा आहे,त्यामुळे ह्यावर लस उपलब्ध नाही.
ह्या आजारावर औषधे उपलब्ध आहेत का?
हा विषाणू नवा असल्यामुळे ह्यावर औषधदेखील उपलब्ध नाही.
परंतु औषध व लस दोन्ही
विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
*तर मंडळी, स्वस्थ रहा-मस्त रहा आणि एकदम निर्धास्थ रहा.*