वांद्रे टर्मिनस ते उडपी होळीनिमित्त दोन विशेष एक्स्प्रेस


मुंबई : होळीनिमित्त कोकण आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दोन विशेष एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस ते उडपीपर्यंत धावतील. तर, मध्य रेल्वेद्वारे होळी विशेष एक्स्प्रेस एलटीटी ते नागपूरपर्यंत धावतीलवांद्रे टर्मिनस ते उडपी विशेष एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस ८ मार्च रोजी रात्री ११.५५ वाजता सुटेल. ती उडपी येथे दसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मार्च रोजी उडपी येथून सायंकाळी ७ वाजता सुटेल. ही एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस येथे दसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता पोहोचेल.


वांद्रे टर्मिनसहून १० मार्च रोजी रात्री ११.५५ वाजता सुटेल. ती उडपी येथे दसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ११ मार्च रोजी उडपी येथून सायंकाळी ७ वाजता सुटेल. वांद्रे टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल.


११ मार्च रोजी एलटीटीहन रात्री १२.४५ वाजता विशेष वाजता पोहोचेल. तर, १२ फेब्रुवारीला नागपूरहून सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ती एलटीटीला सकाळी ७.३० वाजता पोहोचेल.