रोलेक्स कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार


मुंबई प्रतिनिधी : रोलेक्स कंपनीने महावितरणला सदोष वीज मीटरचा पुरवठा करून महावितरण व ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत पावले उचलण्यात येतील. तसेच याप्रकरणात महावितरणाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. याप्रकरणात  कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विधानसभेत दिली.
   रोलेक्स व फ्लॅश कंपन्यांनी महावितरणला मागील सरकारच्या काळात 10 लाख वीज मीटरचा पुरवठा केला . त्यापैकी 4 लाख 30 हजार मीटर्स सदोष आढळले असून यात  160.803 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


यापूर्वी या कंपन्याना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. नुकसान भरपाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली.
आमदार सुनिल राऊत आणि सुनील प्रभू यांनी त्यासंबंधीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.


Popular posts
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
Image