सांगवी पोलिसांचा रुटमार्च ; नागरिकांकडून पोलिसांचे टाळ्या वाजवून स्वागत


सांगवी - येथील पोलिसांनी नवी सांगवी आणि परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूटमार्च केला.दरम्यान नागरिकांनी पोलिसांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांना देखील काम करण्यासाठी स्फूर्ती येत आहे.


नवी सांगवी, कृष्णा चौक, फेमस चौक, काटे पुरमचौक, साठ फुटी रोड या परिसरात सोमवारी सांगवी पोलिसांनी रूटमार्च केला. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि २२ कर्मचारी सहभागी झाले होते. नवी सांगवी येथील नागरिकांनी पोलिसांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.


सर्वांनी एकत्र येऊन या कोरोना विरोधात संयमाने लढा दिल्यास लवकरच लॉकडाऊनच्या परिस्थितीतून सुटका होणार आहे. पोलीस या परिस्थितीत समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वात पुढे काम करत आहेत.समाजाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पोलिसांचे देखील नागरिक मनोधैर्य वाढवत असल्याचे यातून दिसून येत आहे