मुंबई - राज्यभरात संचारबंदी लागू असतानाही नागरिक अनेकदा रस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे पोलिसांना आपलं कर्तव्य बजावताना अडचणी येत आहेत.
यावर पर्याय म्हणून पोलीस अद्यापही रस्त्यावर कार्यरत आहेत, याची जाणीव सर्वसामान्यांना करुन देण्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये स्थानिक पोलिसांनी संचलन केले.
याचप्रमाणे गिरगावातही पोलिसांनी शुक्रवारी आपल्या ताकदीचे दर्शन घडवले. दरम्यान, लोकांनी आपापल्या घरांमधून त्यांना टाळ्या वाजवून पाठिंबा दर्शवला.