कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न


ठाणे  : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. देशासह, मुंबईत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या रुग्णाचे काही ठाण्यात नातेवाईक आहेत का, त्यांच्याशी या रुग्णाचा काही संपर्क आला आहे का, संपर्क आला असल्यास तत्काळ त्याचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करा, कोरोनाला आपल्याला हरवायचे असले तर कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात येत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना होम क्वॉरान्टाईन किवा पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवावे व त्यांची वेळीच योग्य तपासणी करुन पुढील धोका टाळावा असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले आहेत. 
 गुरुवारी दुपारी त्यांनी लोकशाही आघाडीचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या समवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाला हरवायचे असेल तर आपल्याला विविध उपाय योजना करणे आणि काही वेळेस कठोर निर्णय देखील घ्यावे लागणार असल्याचे सांगितले. सध्या महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत जात आहे. आता तर रुग्णावर उपचार करणा-या डॉक्टरालासुध्दा कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे असे जर रुग्ण आढळत असतील तर त्यांच्या संपर्कात येणा:या प्रत्येकाचा शोध घेऊन वेळीच त्यावर योग्य ती खबरदारी घेणो गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार अशा संपर्कात येणा:यांचा शोध घेऊन त्यांना वेळीच क्वॉरान्टाइन करावे जेणेकरुन भविष्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाला आपल्याला रोखण्यास मदत होईल. त्यानुसार याची काळजी घेऊन पालिकेने त्यांच्या टीम तयार करुन तशी पाहणी करुन, त्या संशयीतांचे तपासणी अहवालही तत्काळ कसे उपलब्ध होतील यासाठी देखील पावले उचलणो गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी काम करणा-या टीमचेही यावेळी महापौरांनी त्यांचे कौतुक केले. तसेच प्रत्येक अधिका-यांवर कामाची जबाबदारी निश्चित करावी. जेणे करुन मुंबईत ज्या पध्दतीने कोरोना वाढत आहे, तसा फैलाव ठाण्यात होऊ नये यासाठी ही जबाबदारी देण्यात यावी. शिवाय मुंबईतून अथवा देशाच्या इतर भागात असलेल्या कोरोना  बाधीत रुग्णाच्या संपर्कात  ठाण्यातला जर कोणी आला असेल तर त्याचाही आता शोध घेऊन त्यांचीही तपासणी केली जावी व त्या संबंधी काळजी घ्यावी अशा सुचनाही त्यांनी दिल्या. तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी. आरोग्य अधिकारी, केंद्रप्रमुख, डॉक्टर्स, सर्व कर्मचारी खूप चांगले काम करीत असल्याचे सांगत आयुक्त विजय सिंघल यांच्या कामाचे देखील महापौर नरेश म्हस्के यांनी कौतुक केले.