संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांकडून दिले जाणारे दाखले, परवाने मिळणार नाहीत -पुणे ग्रामीण पोलीसांची माहिती


पुणे – संचारबंदी सुरू असताना नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्यास संबंधितांना पोलिसांकडून दिले जाणारे दाखले आणि परवाने भविष्यकाळात मिळणार नाहीत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.अनेक कारणांसाठी पोलीस व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असते. प्रत्येकाला कधीतरी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावीच लागते. त्यात जर पोलिसांकडून एखाद्या कारणासाठी दाखला घ्यायचा असेल तर पोलीस संबंधित व्यक्तीची संपूर्ण कुंडली काढतात. त्यात जर त्या व्यक्तीवर पूर्वीचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड असेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यात भरीस भर म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी सध्या सुरू असलेक्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांकडून दिले जाणारे दाखले द्यायचेच नाहीत, असे स्पष्ट केले आहे.


नागरिकांना विशेषतः तरुणांना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी दाखले, पासपोर्ट, शस्त्र परवाना, व्यवसाय परवाने तसेच शासकीय नोकरी, खासगी नोकरी यासाठी विविध दाखले पोलिसांकडून घ्यावे लागतात. सध्या सुरू असलेल्या संचारबंदीचे नागरिकांनी उल्लंघन केले, तर संबंधित नागरिकांना वरील कोणतीही कागदपत्रे पोलिसांकडून दिली जाणार नाहीत, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणे महागात पडणार आहे.अनेकांची विदेशवारी पासपोर्ट न मिळाल्याने रद्द होऊ शकते. नवीन व्यवसायाचे स्वप्न, बहुदेशीय कंपनीत, सरकारी नोकरी मिळण्यासाठी देखील यामुळे अडचणी येऊ शकतात. शस्त्र परवाना काढण्यासाठी गेलात तर तिथेही संबंधितांवर यापूर्वी गुन्हा दाखल असल्याने त्यावेळी देखील अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणे उज्वल भविष्यावर बेतण्याची भीती आहे.


पुणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि.१३) संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या १५५ तसेच मास्क न घातलेल्या ६८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या दरम्यान पोलिसांनी ६३ वाहने देखील जप्त केली आहेत.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image