पत्रकार संजय पालशेतकर यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी आ.गोगावले यांची आर्थिक मदत


पोलादपूर : दैनिक सनातन प्रभात, दै. रामप्रहर तसेच सध्या दै. पुण्यनगरी या वृत्तपत्रांतून नोकरी करून पत्रकारिता करणारे पोलादपूर आनंदनगर येथील पत्रकार संजय पालशेतकर यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून 25 हजार रूपयांची आर्थिक मदत आमदारपत्नी सुषमा गोगावले यांच्याहस्ते त्यांचा लहान भाऊ सुदेश पालशेतकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.


पोलादपूर शहरातील आनंदनगर येथील पत्रकार संजय पालशेतकर यांना उजव्या बाजूला अचानकपणे अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. पनवेल येथील गांधी रूग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि 10 दिवसांच्या औषधोपचारासाठी 4 लाखांहून अधिक खर्च होण्याचा अंदाज डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याने पालशेतकर यांची पत्नी समिधा आणि कुटूंबियांनी मदतीचे आवाहन केले होते. पालशेतकर यांची कौटूंबिक परिस्थिती हलाखीची असताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुठेही मदत मागण्यासाठी जाता येत नाही तसेच सर्व कार्यालये बंद असून खर्चही तातडीने उपलब्ध होण्याची गरज असताना महाडचे आ.गोगावले यांच्या कानावर पालशेतकर कुटूंबियांचे आवाहन येताच ताबडतोब 25 हजार रुपयांची रोख रक्कम पालशेतकर यांच्या नातेवाईकांकडे मदत म्हणून दिली.


आ.गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई गोगावले यांनी पत्रकार पालशेतकर यांचे बंधू सुदेश यांना सुपूर्द केली.